Friday, December 12, 2008

आलोच...

केशव आणि माधव जिगरी दोस्त. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दोघेही संध्याकाळी बारमध्ये निवांत बिअरचा आस्वाद घेत. परंतु, माधवने ऑफिसातील त्याच्या सहकारिणीशी प्रेमविवाह केला आणि त्यांच्या या साप्ताहिक परंपरेत खंड पडला. माधव-मालती बरोबरच ऑफिसला जात-येत आणि सुट्टीच्या दिवशीही मालती माधवला एकटा सोडत नसे. असे वर्ष गेले. एका संध्याकाळी केशव एकटाच बिअरचे घुटके घेत असताना अचानक माधव समोर येऊन बसला.
केशवने विचारले, ''काय रे माधवा, आज कसं काय गंडवलस बायकोला?''
''काही नाही यार, तिला शॉपिंगसाठी शेजारच्या साड्यांच्या मॉलमध्ये सोडले नि दोन मिनिटांत आलोच म्हणून सटकलो. आता किमान दोन-अडीच तास तरी तिला माझी आठवण देखील येणार नाही. तोपर्यंत उथलं उरकून जातोच बिल द्यायला...!''

3 comments:

साधक said...

Hyala kay vinod mhantat ka?

अनिकेत भानु said...

ह्म... हा विनोद चांगला नव्हता. पण याआधीचे काही मस्तच होते.

HAREKRISHNAJI said...

छान