Tuesday, December 9, 2008

त्याग

अतिमद्यपान केल्याने शेवटी व्हायचे तेच झाले. सदाच्या लिव्हरला सूज आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टर सदाला म्हणाले, ''हे बघ सदा, तुला जर दीर्घायुषी व्हायचे असेल, तर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल.''
त्यावर सदा म्हणाला, ''डॉक्टर तो तर मी करतोच आहे. मधुमेह व्हायला नको म्हणून एक वर्षापासून मी चहा सोडलाय.''
''अरे वा!''
''आणि तुम्हाला सांगतो डॉक्टर, वजन वाढायला नको म्हणून मी भातदेखील अजिबात खात नाही.''
''शाबास!''
''शिवाय रक्तदाब नियंत्रणात राहावा, म्हणून मी बायकोला सांगूनच ठेवलंय की जेवणात मीठ कमी टाक म्हणून.''
''अरे, तू तर बराच त्याग करतोयस की...''
''एवढंच नाही डॉक्टर, अल्सर, मूळव्याधाचा धोका नको म्हणून तेलकट, तिखट तर मी टाळतोच...''
''ते सर्व ठीक आहे रे, पण त्यापेक्षाही सगळ्यात आधी तुला दारू सोडावी लागेल!''
''तेवढं सोडून बोला डॉक्टर, दारूशिवाय मी जगूच शकणार नाही...''
''सॉरी सदा, दारू सोडली नाहीस, तर तुला आणखी एक गोष्ट लागेल...''
''कोणती?''
''हे जग!''

No comments: