लग्न लागल्या दिवशीच पीटर बारमध्ये दिसला, तेव्हा वेटरने आश्चर्याने विचारले,
''अहो साहेब, दुपारीच तुमचे लग्न लागले आणि संध्याकाळी तुम्ही इथे!''
''अरे यार आज मै बहुत खुश हूँ... आज माझी सुहाग रात...''
दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पुन्हा बारमध्ये दिसला, तेव्हा -
''साहेब, काल तुमची सुहाग रात... आणि आज सकाळीच तुम्ही इथे!''
''काय करणार, सुहाग रात्रीलाच आमची तर्रर्र अवस्था पाहून बायको उडाली भुर्रर्र... त्याच गममध्ये आलोय!''
Sunday, March 14, 2010
Sunday, March 7, 2010
सेलिब्रेशन..
काय मग, आज तुमच्या लग्नाचा विसावा वाढदिवस...
हो!
मग काही विशेष सेलिब्रेशन?
केलं ना!
काय?
कचकचून भांडलो...
आँ?
एकमेकांची उणीदुणी काढली!
आणि?
दिवसभर अबोला धरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या...!
हो!
मग काही विशेष सेलिब्रेशन?
केलं ना!
काय?
कचकचून भांडलो...
आँ?
एकमेकांची उणीदुणी काढली!
आणि?
दिवसभर अबोला धरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या...!
Thursday, December 31, 2009
अर्धा प्याला भरलेला!
नैराश्याने खूपच ग्रासल्याने मध्या एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला.
''डॉक्टर, मला खूप निराश वाटतंय, जगण्यात काही अर्थच नाही अशी माझी भावना झालेली आहे.''
''हे बघ, एवढा निराश होऊ नकोस. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहा.''
''पण ते कसं पाहायचं?''
''मला एक सांग, की तुला अर्धा भरलेला काचेचा ग्लास कसा दिसतो?''
''डॉक्टर, त्यात जर पाणी असेल, तर तो ग्लास मला अर्धा रिकामा वाटतो आणि जर त्यात दारू असेल तर तो मला भरलेला वाटतो....''
Sunday, February 22, 2009
उद्घाटन
व्यवस्थापक - आज आमच्या जलतरण तलावाचा प्रथम वर्धापनदिन... आणि या तलावाचे उद्घाटक मंत्रिमहोदय यांचा प्रथम स्मृतिदिन.
पत्रकार - म्हणजे?
व्यवस्थापक - अहो, मंत्रिमहोदयांचा शिरस्ताच तसा होता. केशकर्तनालयाचे उद्घाटन त्यांनी स्वतःचे केस कापून केले, तर भोजनालयाचे भोजन करूनच!
पत्रकार - मग इथे काय केले?
व्यवस्थापक - उद्घाटन समारंभाला आल्या आल्या त्यांनी जलतरण तलावात छान सूर मारला आणि....
पत्रकार - आणि काय?
व्यवस्थापक - त्यांना पोहता कुठे येत होतं...!

Wednesday, February 4, 2009
ती
राजू - तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही.
संजू - काय सांगतोस!
राजू - आणि ती प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही...
संजू - म्हणजे?
राजू - कारण, ती माझ्या स्वप्नातली परी आहे.
संजू - छान!
राजू - जगातल्या निर्दय तरुणींपेक्षा नक्कीच बरी आहे...
संजू - काय सांगतोस!
राजू - आणि ती प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही...
संजू - म्हणजे?
राजू - कारण, ती माझ्या स्वप्नातली परी आहे.
संजू - छान!
राजू - जगातल्या निर्दय तरुणींपेक्षा नक्कीच बरी आहे...
Monday, February 2, 2009
रस
भरदुपारी सदा आणि मध्या मद्यालयात बसले होते.
सदा - यार मध्या, कधी कधी मला आयुष्यात रसच वाटत नाही.
मध्या - कसा वाटणार!
सदा - म्हणजे?
मध्या - कारण, तू रसवंतिगृहात जाऊन साधा उसाचा रस कधी घेतच नाहीस ना!... जेव्हा पाहावं तेव्हा तू आपला इथे सोमरसाच्याच आधीन असतोस!

Sunday, February 1, 2009
कुंकू आणि टिकली
पत्नी - मी म्हणून टिकले, दुसरी कुणी असती ना, तर...
पती - तर काय?
पत्नी - तर आतापर्यंत कधीच सोडून गेली असती....
पती - अगं, तोच तर प्रॉब्लेम आहे!
पत्नी - (चिडून) म्हणजे?
पती - तू कुंकू नाहीस, टिकली आहेस!
पती - तर काय?
पत्नी - तर आतापर्यंत कधीच सोडून गेली असती....
पती - अगं, तोच तर प्रॉब्लेम आहे!
पत्नी - (चिडून) म्हणजे?
पती - तू कुंकू नाहीस, टिकली आहेस!
Subscribe to:
Posts (Atom)