Wednesday, December 10, 2008

कुणीही सांगेल...!

''...तुम्ही तिथं आलात, की कुणालाही विचारा... अगदी शेंबडं पोरसुद्धा सांगेल या नानाचा पत्ता...''
एवढं बोलून नानांनी फोन ठेवला आणि पाहुण्यांची वाट पाहू लागले. दुपार उलटली... संध्याकाळ झाली तरी पाहुण्यांचा पत्ता नव्हता. रात्रीचे आठ वाजले आणि फोन खणाणला. फोनवर पाहुणेच बोलत होते-
''तुम्ही सांगितलं तिथं येऊन दुपारपासून प्रत्येकाला विचारतोय हो, पण कुणालाही तुमचं घर माहीत नाहीए हो...''
''बरं बरं, असू दे... आत्ता तुम्ही कुठे उभे आहात तेवढं सांगा...''
''संपर्क एसटीडी बूथ.''
''अगदी बरोब्बर आलात बघा. त्या एसटीडी बूथची पाटी आहे ना, त्याच्या वरची खिडकी आमचीच. शेजारच्या जिन्यानं सरळ वर या... पहिल्या मजल्यावरचं पहिलंच घर... कुणीही सांगेल...!''

1 comment:

आशा जोगळेकर said...

कुणी ही सांगल काय ?