Tuesday, December 2, 2008

दुःखी मन मेरे...

उडपी संतोष भुवनसमोर चकाचक आणि अत्याधुनिक डायनिंग हॉल सुरू झाला. संतोष भुवन ओस पडू लागले. माश्या मारत बसलेला उडपी वैतागून आपल्या मित्राला म्हणाला, ''काय करावं हेच कळत नाही. समोरचा डायनिंग हॉल सुरू झाल्यापासून कुणी माझ्या हॉटेलात फिरकतच नाही रे...''
मित्र म्हणाला, ''समोरच्या डायनिंग हॉलचं नाव काय आहे म्हणालास?''
''आनंदी डायनिंग हॉल.'' उडपी उत्तरला.
''अरे मग तू बार सुरू कर - दुःखी रेस्टॉरंट अँड बिअर बार!''

No comments: