रामूला शाळेत जायचा खूप कंटाळा. दर दोन दिवसाआड काही ना काही कारण काढून तो शाळेत जाणे टाळायचा. त्यासाठीची कारणेही अफलातून असत. शाळा सुरू होऊन एक आठवडा उलटला आणि सोमवारी सकाळीच तो आईला म्हणाला, ''आज शाळेला सुट्टी!''
''कशाबद्दल?'' आईने विचारले.
''अगं आज शाळा सुरू झाली त्याचा साप्ताहिक वधार्पनदिन आहे.''
दोन दिवसांनी शाळा बुडविण्यासाठीचे त्याचे कारण होते- आज आमच्या माजी मुख्याध्यापकांचा प्रथम स्मृतिदिन आहे.
अशी कारणे सांगता सांगता त्याचा वाढदिवस आला. नेहमीच्या सवयीने रामू आईला म्हणाला, ''आई आज मी शाळेत जाणार नाही.''
''का रे?'' आई म्हणाली.
''अगं, आज माझी जयंती आहे.''
Friday, December 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment