Sunday, December 14, 2008

बाकरवडीची चव...

लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघताना सदा रिक्षाने आधी शनिपाराजवळ जाई. रांगेत उभा राहून पावकिलो बाकरवडी घेई. त्यानंतर एक लिटर पाण्याची बाटली घेऊन तो त्यातील साधारण 100 मिलिलीटर पाणी पिऊन त्यात 90 मिलिलीटर व्हाईट रम किंवा व्होडका मिसळे आणि मग ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर जाई. अशाच एका प्रवासात गाडीने वेग घेतल्यावर त्याने बाटलीतल्या 'पाण्याचा' घोट घेतला आणि बाकरवडीचा पुडा फोडला.
'एक घोट- एक बाकरवडी' असा त्याचा दोन कलमी कार्यक्रम शेजारी बसलेल्या एका चिकित्सक पुणेकराच्या लक्षात आला.
त्याने सदाला विचारले, ''का हो, एक विचारू?''
''विचारा की!''
''नाही म्हणजे मलाही बाकरवडी आवडते, पण मी आधी बाकरवड्या खातो आणि मग एकदाच पाणी पितो. पण मी मघापासून बघतोय की तुम्ही आधी पाणी पिताय आणि मग एक बाकरवडी खाताय, असे का?''
'पाण्याचा' एक दीर्घ घोट घेत सदा म्हणाला, ''अहो, त्याशिवाय बाकरवडीची अस्सल चव कळत नाही!''

No comments: