Thursday, December 4, 2008

दुःख

खूप वर्षांनी भेटलेल्या दोन मित्रांचा कॉफीशॉपमध्ये संवाद चालू होता.
''तुला सांगतो, कॉलेजात असताना माझी काय वट होती. कॉलेजच्या गेटवर जरी माझं नाव सांगितलं तरी कुणीही माझ्यापर्यंत येऊन पोचत असे.''
''मग तुला खूप मुली ओळखत असतील नाही!''
''अरे, मुली तर माझी ओळख करून घेण्यासाठी ध़डपडायच्या...''
''काय सांगतोस'?''
''खरंच सांगतोय यार...''
''पण एवढ्या मुलींशी ओळखी असूनही वयाची चाळिशी तू ओलांडलीस तरी अजून तुझं लग्न कसं झालं नाही?"
''तेच तर दुःख आहे यार, कॉलेजात दर रक्षाबंधनाला माझे दोन्ही हात राख्या बांधायला पुरायचे नाहीत, पण फ्रेंडशिप डेला तेच माझे दोन्ही हात चक्क ओस पडायचे रे....!''

No comments: