Wednesday, January 21, 2009

फिक्सिंग

जागतिक मंदीमुळे मार्केटिंग क्षेत्रातील नोकरी गमावलेल्या अमरने पुण्यातल्या मध्यवस्तीत अतिशय छोटेखानी जागेत हॉटेल सुरू केले. तेथे फक्त वडापाव हा एकच पदार्थ ठेवला. पहिल्याच दिवशी त्याच्या ह़ॉटेलपुढे रांग लागली. अल्पावधीत त्याचा वडापाव प्रसिद्ध झाला. चोखंदळ पुणेकर तासन् तास रांगेत उभे राहून वडापावचा आस्वाद घेऊ लागले.
अमरच्या एका मित्राने त्याला विचारले, ''कशी काय बुवा तुझ्याकडे एवढी गर्दी असते. नक्कीच काहीतरी खास रेसिपी असणार!''
''काही नाही रे, माझा वडापाव, रस्त्यावरच्या वडापावसारखाच आहे. फक्त मी गर्दीचं फिक्सिंग केलं.''
''म्हणजे?''
''अरे, मी पहिल्या दिवसापासून कायम दुकानापुढे रांग राहील याची काळजी घेतली. प्रसंगी भाडोत्री ग्राहक उभे करून... आपली नेतेमंडळी नाही का, सभेला गर्दी जमवतात तसंच!''

No comments: