Wednesday, January 21, 2009

पिच्छा

कॉलेजच्या कँटीनमध्ये राखी आपल्या मैत्रिणीला सांगत होती-
''अगं जाम वैतागले होते मी, त्या काळ्या संजूनं माझा पक्का पिच्छा पुरविला होता. मी जाईल तिथे माझ्या मागेच!''
''मग कसा काय सोडविला पिच्छा?''
''काही नाही गं, थोडं डोकं चालवलं.''
''ते कसं?''
''एकदा धाडस करून त्याला सामोरी गेले.''
''आणि?''
''त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढविला.''
''कसा काय?''
''त्याला म्हणाले- तुझ्यासारख्या एवढ्या स्मार्ट, देखण्या, रुबाबदार तरुणानं असं माझ्या मागेमागे येणं काही बरं दिसत नाही. त्यापेक्षा, आजपासून मीच तुझ्या मागे लागते... अट फक्त एकच- मागे वळून पाहायचं नाही... खात्री बाळग मी तुझ्याच मागे असेल!''

No comments: