Saturday, January 3, 2009

समारोप...

कविसंमेलन रंगात आलं होतं.
''...आता रात्रीचे बारा वाजलेत, तेव्हा आपल्यातील ज्येष्ठ कवी दगडुसुत समारोपाची कविता म्हणून या मैफलीचा समारोप करतील.''
एवढं बोलून सूत्रसंचालक त्यांच्या हातात माईक देणार तोच जवळजवळ खेचूनच धोंडुसुतांनी माईकचा ताबा घेतला.
''कविमित्रांनो, एक मिनीट, समारोपावरून मला आताच सुचलेली एक कविता मी समारोपापूर्वी सादर करतो. त्यानंतर दगडुसुत समारोप करतील...''
आणि त्यानंतर गंगूकुमार, शेवंताग्रज, लालकवी यांच्याकडे माईक फिरत राहिला. पहाटे कोंबडा आरवला तरी दगडुसुतांच्या हाती काही माईक आला नाही... आणि तानाजी बाळाच्या भूपाळीने एका नव्या मैफलीचा प्रारंभ झाला.

No comments: