Thursday, January 1, 2009

स्वयंचलित!

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सदाने यथेच्छ मद्यपान केले. बारा वाजता नववर्षाच्या स्वागताच्या फटाक्यांनी त्याला घरी जाण्याची जाणीव झाली. कसाबसा तो हॉटेलच्या बाहेर आला आणि गुरख्याला टीप देऊन मोटारसायकल स्टार्ट करून घेतली. पहिल्याच चौकात पोलिसांच्या तपासणी पथकाने त्याला अडविले.
''महाशय, आपण मद्यपान केले आहे.''
''हो, खोटं कशाला बोलू?''
''आणि दारू पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. एक हजार रुपये दंड भरावा लागेल.''
''पण मी कुठे गाडी चालवत होतो.''
''पण या गाडीवर तर तुम्ही एकटेच आलात, मग गाडी कोण चालवत होतं?''
''हवालदार साहेब, माफ करा. गाडीवर मी आलो हे खरं आहे, पण गाडी मी चालवलीच नाही!''
''कसं काय?''
''अहो, हे स्वयंचलित दुचाकी वाहन आहे साहेब, ऑटोमॅटिक... मी फक्त त्यावर बसलो होतो!''

No comments: