Friday, January 16, 2009

स्पर्श

अजय आणि विजय दोघे जिवलग मित्र. दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच. त्यामुळे दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले. दोघांमध्येही तिला प्रभावित करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा संघर्षाचे प्रसंग निर्माण होऊ लागले. शेवटी दोघांनीही सहमतीने ठरविले- 'आपल्यापैकी जो आधी तिला स्पर्श करेल. त्याने तिला प्रपोज करायचं.'
बरेच दिवस उलटूनही दोघांनाही तसे धाडस करता आले नाही.
एका संध्याकाळी मात्र विजय धावतच अजयकडे आला,
''अज्या, शेवटी मीच विजय मिळविला.''
''कसा काय?''
''तिचा स्पर्श मला प्राप्त झाला.''
''पण याला पुरावा काय?''
''पुरावा ? अरे हा बघ माझा लालबुंद झालेला गाल!''
''म्हणजे?''
''अरे, मी तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न करताच तिने माझ्या जोरदार थोबाडीत मारली आहे! आहेस कुठे? ''

No comments: