Sunday, January 18, 2009

निरपेक्ष.. निर्मळ... निखळ

फ्रेडशिप डेला फ्रेडशिप बँड बांधल्यापासून अजय-अनिताच्या भेटी वाढू लागल्या. तासन् तास ते कॉफी शॉपमध्ये घालवू लागले. अनिताला नेहमी वाटायचं की कधीतरी अजय आपल्या प्रेमाची कबुली देईल. त्या दिवशी कॉफी शॉपच्या कोपऱ्यातल्या टेवलवर ते कॉफी घेत होते. अजय बराच रोमँटिक मूडमध्ये आल्यासारखा वाटला, पण...
''अनिता, खरं सांगतो, तुझ्याकडे कुणी 'त्या' दृष्टीनं पाहिलेलं मला अजिबात खपत नाही.'' अजय म्हणाला.
''काय सांगतोस?'' अनिता उल्हसित होत म्हणाली.
''एवढंच नाही तर मी स्वतःसुद्धा तुझ्याकडे कधी 'त्या' दृष्टीनं पाहिलं नाही.''
''आँ!''
''अनिता, माझं ना तुझ्यावर प्रेम आहे... अगदी निरपेक्ष.. निर्मळ... निखळ... पवित्र!''
''बाप रे!''
छताकडे नजर लावून अजय शेवटी म्हणाला,
''तुला साधा स्पर्श करण्याची कल्पनाही मी करू शकत नाही गं!''
अनिताने हळूच तेथून काढता पाय घेतला.

No comments: