खोकल्याने हैराण झालेल्या सदाला डॉक्टरांनी कफ सिरप लिहून दिले.
''सकाळ-दुपार-संध्याकाळ असे तीन वेळा घे.'' डॉक्टरांनी सांगितले.
मध्यरात्री सदाच्या बायकोचा डॉक्टरांना फोन आला.
''डॉक्टर, ताबडतोब या. हे कसेतरीच करतायत...''
डॉक्टर लगबगीने गेले. तपासताना त्यांना शेजारच्या टीपॉयवर भलीमोठी कफ सिरपची बाटली दिसली. त्यांनी सदाला विचारले,
''सदा, औषध किती वेळा घेतलं?''
''सकाळ-दुपार-संध्याकाळ... तीन वेळा एक-एक पेग घेतला डॉक्टर!''
Wednesday, January 28, 2009
Sunday, January 25, 2009
आमचे हे!
लक्ष्मीबाई - तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कित्ती छान आहे नाही! नाहीतर आमचे हे... मेलं कौतुकच नाही कसलं!
पार्वताबाई - तुमच्या मिस्टरांबद्दल माझंही असंच मत आहे.... नाहीतर आमचे हे!

Saturday, January 24, 2009
व्याख्या
घटस्फोट घेण्यापूर्वी त्या उभयतांना न्यायाधीशांनी केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून समुपदेशकाकडे (काऊन्सिलरकडे) पाठविले.
समुपदेशकाने पत्नीला विचारले, ''तुमची पतीबद्दलची व्याख्या काय?''
पत्नी - मी जे काही चांगले करते त्यावर जो बोळा फिरवतो आणि माझ्या हातून जे काही वाईट घडते त्याला कारणीभूत असलेला एकमेव प्राणी! ज्याच्यामुळे माझ्या सोन्यासारख्या संसाराचे वाटोळे झाले.
समुपदेशक - मिस्टर, तुमच्या मनातली पत्नीची व्याख्या सांगा...
पती - माझ्यामुळे जे काही चांगले होते, त्याचे श्रेय घेण्यात जी नेहमीच तत्पर असते आणि तिच्यामुळे जे काही वाईट घडते त्याचा दोष जी कायम माझ्या कपाळी मारते ती!

Friday, January 23, 2009
प्रायश्चित्त
''काय हो सावित्रीबाई, आजच्या आधुनिक काळातही वटसावित्रीची पूजा तुम्ही अगदी धूमधडाक्यात करता... बरंच प्रेम दिसतंय नवऱ्यावर! जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणूनच ना?''
''नाही हो! वर्षभर केलेल्या प्रार्थनेचं प्रायश्चित्त म्हणून करते.''
''प्रायश्चित्त अन् ते बाई कसलं?''
''वर्षभर रोज मी देवाजवळ प्रार्थना करत असते, की असा नवरा मलाच काय, कुठल्याच बाईला देऊ नकोस रे देवा!''

Wednesday, January 21, 2009
फिक्सिंग
जागतिक मंदीमुळे मार्केटिंग क्षेत्रातील नोकरी गमावलेल्या अमरने पुण्यातल्या मध्यवस्तीत अतिशय छोटेखानी जागेत हॉटेल सुरू केले. तेथे फक्त वडापाव हा एकच पदार्थ ठेवला. पहिल्याच दिवशी त्याच्या ह़ॉटेलपुढे रांग लागली. अल्पावधीत त्याचा वडापाव प्रसिद्ध झाला. चोखंदळ पुणेकर तासन् तास रांगेत उभे राहून वडापावचा आस्वाद घेऊ लागले.
अमरच्या एका मित्राने त्याला विचारले, ''कशी काय बुवा तुझ्याकडे एवढी गर्दी असते. नक्कीच काहीतरी खास रेसिपी असणार!''
''काही नाही रे, माझा वडापाव, रस्त्यावरच्या वडापावसारखाच आहे. फक्त मी गर्दीचं फिक्सिंग केलं.''
''म्हणजे?''
''अरे, मी पहिल्या दिवसापासून कायम दुकानापुढे रांग राहील याची काळजी घेतली. प्रसंगी भाडोत्री ग्राहक उभे करून... आपली नेतेमंडळी नाही का, सभेला गर्दी जमवतात तसंच!''

पिच्छा
कॉलेजच्या कँटीनमध्ये राखी आपल्या मैत्रिणीला सांगत होती-
''अगं जाम वैतागले होते मी, त्या काळ्या संजूनं माझा पक्का पिच्छा पुरविला होता. मी जाईल तिथे माझ्या मागेच!''
''मग कसा काय सोडविला पिच्छा?''
''काही नाही गं, थोडं डोकं चालवलं.''
''ते कसं?''
''एकदा धाडस करून त्याला सामोरी गेले.''
''आणि?''
''त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढविला.''
''कसा काय?''
''त्याला म्हणाले- तुझ्यासारख्या एवढ्या स्मार्ट, देखण्या, रुबाबदार तरुणानं असं माझ्या मागेमागे येणं काही बरं दिसत नाही. त्यापेक्षा, आजपासून मीच तुझ्या मागे लागते... अट फक्त एकच- मागे वळून पाहायचं नाही... खात्री बाळग मी तुझ्याच मागे असेल!''

Monday, January 19, 2009
थेट खरेदी
रास्त भावात खरेदी करण्याबाबत आपण किती चोखंदळ आहोत, हे गोपाळराव गोविंदरावांना सागत होते.
''तुम्हाला सांगतो, मी थेट उत्पादकाकडूनच खरेदी करतो. त्यामुळे मालही चांगला मिळतो आणि पैशांचीही प्रचंड बचत होते.''
''ती कशी काय?''
''आता हेच बघा, (पिशवीतली वांगी दाखवत) साधी वांगी आपल्या जवळच्या भाजीवाल्याकडे वीस रुपये किलो आहेत. तुम्ही अगदी मार्केटयार्डात गेलात तरी ती फार तर दहा रुपये किलो मिळतील...''
''मग तुम्ही कशी आणलीत?''
''फक्त चार रुपये किलोने!''
''कुठून?''
''अहो थेट शेतातूनच खरेदी केली. येथून तीस किलोमीटरवरच्या गावात सकाळीच स्कूटरवर गेलो आणि ही एकदम ताजी एक किलो वांगी घेऊन आलो.''

Sunday, January 18, 2009
निरपेक्ष.. निर्मळ... निखळ
फ्रेडशिप डेला फ्रेडशिप बँड बांधल्यापासून अजय-अनिताच्या भेटी वाढू लागल्या. तासन् तास ते कॉफी शॉपमध्ये घालवू लागले. अनिताला नेहमी वाटायचं की कधीतरी अजय आपल्या प्रेमाची कबुली देईल. त्या दिवशी कॉफी शॉपच्या कोपऱ्यातल्या टेवलवर ते कॉफी घेत होते. अजय बराच रोमँटिक मूडमध्ये आल्यासारखा वाटला, पण...
''अनिता, खरं सांगतो, तुझ्याकडे कुणी 'त्या' दृष्टीनं पाहिलेलं मला अजिबात खपत नाही.'' अजय म्हणाला.
''काय सांगतोस?'' अनिता उल्हसित होत म्हणाली.
''एवढंच नाही तर मी स्वतःसुद्धा तुझ्याकडे कधी 'त्या' दृष्टीनं पाहिलं नाही.''
''आँ!''
''अनिता, माझं ना तुझ्यावर प्रेम आहे... अगदी निरपेक्ष.. निर्मळ... निखळ... पवित्र!''
''बाप रे!''
छताकडे नजर लावून अजय शेवटी म्हणाला,
''तुला साधा स्पर्श करण्याची कल्पनाही मी करू शकत नाही गं!''
अनिताने हळूच तेथून काढता पाय घेतला.

सर्कस
रविवार. विकली ऑफ. गोपाळराव जरा निवांतच उठले. चहा झाल्यावर पेपर वाचता-वाचता पत्नीला म्हणाले,
"अगं ऐक ना, आजच्या पुरवणीत चिकनचा एक झकास मेनू दिला आहे. आज दुपारी तोच बेत करू...''
पत्नी - तुम्हाला ना मेली कसली हौसच नाही मुळी! किती दिवस म्हणतेय बाहेरच जेवायला जाऊ आणि मस्त सर्कस पाहू म्हणून...
गोपाळराव - तुझ्याशी संसार करताना माझी किती सर्कस होतेय पाहतेस ना! मग पुन्हा पैसे आणि वेळ खर्च करून ती फुटकळ सर्कस काय पाहायचीय?

Friday, January 16, 2009
स्पर्श
अजय आणि विजय दोघे जिवलग मित्र. दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच. त्यामुळे दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात पडले. दोघांमध्येही तिला प्रभावित करण्यासाठी जणू स्पर्धाच लागली. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा संघर्षाचे प्रसंग निर्माण होऊ लागले. शेवटी दोघांनीही सहमतीने ठरविले- 'आपल्यापैकी जो आधी तिला स्पर्श करेल. त्याने तिला प्रपोज करायचं.'
बरेच दिवस उलटूनही दोघांनाही तसे धाडस करता आले नाही.
एका संध्याकाळी मात्र विजय धावतच अजयकडे आला,
''अज्या, शेवटी मीच विजय मिळविला.''
''कसा काय?''
''तिचा स्पर्श मला प्राप्त झाला.''
''पण याला पुरावा काय?''
''पुरावा ? अरे हा बघ माझा लालबुंद झालेला गाल!''
''म्हणजे?''
''अरे, मी तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न करताच तिने माझ्या जोरदार थोबाडीत मारली आहे! आहेस कुठे? ''

Thursday, January 15, 2009
माझंही...
शेवटी एकदाचं संजयनं धाडस केलंच. रेश्मा कॉलेजातून घरी परतताना त्याने तिला बसस्टॉपवर गाठलं. मनाचा हिय्या करून तो तिला म्हणाला,
''र..रर.. रेश्मा, माझ ना तुझ्यावर ख.. खख...खूप प्रेम आहे.''
''छान!'' रेश्मा म्हणाली.
पुन्हा धीर एकवटून संजय म्हणाला,
''...आणि तुझं?''
''माझंही खूप प्रेम आहे रे...''
''काय सांगतेस!''
''हो ना, पण तुझ्यावर नाही... सचिनवर!''

कॉस्ट कटिंग
आयटी पार्कमध्ये काम करणारा सॅम अर्थात समीर हल्ली खूप टेन्शनमध्ये असायचा. दिवसेंदिवस त्याचे केस लांबडे आणि कपडे मात्र तोकडे होऊ लागले. शेवटी हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमनने त्याला विचारलेच,
''काय रे सम्या, गेल्या तीन-चार महिन्यांत कटिंग केलेली दिसत नाही. आणि कपडे पण तोकडे शिवतोयस!''
''काय करणार काका, या जागतिक मंदीमुळे आमच्या कंपनीत कॉस्ट कटिंग चालू आहे. त्यामुळे महिन्यागणिक पगार कमी होतोय. त्यामुळे माझं बजेटही कोलमडलंय. गेल्या तीन महिन्यात कटिंगचा खर्च वाचवला. त्याने भागेना मग शर्ट-पँटसाठीचे कापडही दोन मीटरऐवजी एक-एक मीटरच घेतोय!''

Wednesday, January 14, 2009
संक्रांत!
संक्रांतीला तिळगूळ द्यायला आलेल्या जुन्या मित्राला सुरेश आपली प्रेमकहाणी सांगत होता-
''... मी तिच्या प्रेमात पडलो हे तिला कसं कळणार...''
''का?''
''कारण माझ्यात ते सांगण्याचं धाडस नव्हतं. म्हणून मग मी माझ्या एका धाडसी मित्रामार्फत एकदा तिला फूल दिल.''
''नंतर...''
''काही दिवसांनी मित्रामार्फतच प्रेमपत्र दिल.''
''शाबास!''
''आणि आज सकाळीच संक्रातीच्या मुहूर्तावर भेटकार्ड आणि तिळगूळ...''
''स्वतः दिलेस?''
''नाही... मित्रामार्फतच दिले.''
''मग पुढे काय झालं?''
''ती त्या मित्राला म्हणाली, की तू हे स्वतःसाठी का करीत नाहीस, मी लगेच होकार देईल!''
''आणि...''
''मग काय 'दोस्त दोस्त ना रहाँ... प्यार प्यार ना रहाँ...' माझ्या प्रेमावर संक्रात आली रे!''

Tuesday, January 13, 2009
झलक!
''एक दिवसही असा जात नव्हता, की तिची झलक मला मिळाली नाही.''
''काय सांगतोस!''
''हो, ना! ती जर एखादा दिवस जरी मला दिसली नसती, तर मी आज जिवंत नसतो.''
''खरंच!''
''जणू ती माझा श्वासच होती.''
''बाप रे!''
''अगदी तेव्हासुद्धा तिने मला अगदी शेवटच्या क्षणी झलक दिली...''
''कोणत्या क्षणी?''
''तिच्या निर्दय मातापित्यांनी तिचं लग्न लावलं त्या क्षणी!''
''आँ!''
''मंगल कार्यालयात स्टेजपासूनच्या पहिल्या रांगेत मी बसलो होतो आणि बोहल्यावर चढण्यापूर्वी तिनं मला शेवटची झलक दिली.... बस्स! त्याच आठवणीवर दिवस काढतोय यार!''

Saturday, January 10, 2009
सेवन आणि प्राशन
'येथे कोणत्याही स्वरूपातील मादक पदार्थ सेवन करण्यास मनाई आहे. - हुकुमावरून'
अशी पाटी असूनही सदाने हळूच पिशवीतून बाटली काढून ग्लासात ओतली. तो पहिला घोट घेणार तोच वेटरने त्याला रोखले आणि पाटी दाखविली. त्यावर सदा म्हणाला.
''पण मी सेवन कुठे करतोय... मी तर प्राशन करतोय...''

Friday, January 9, 2009
नजर
''...या महान लोकशाही देशात मी मुक्तपणे स्वातंत्र्य उपभोगत होतो. पण अचानक माझीच माझ्या स्वातंत्र्याला नजर लागली.''
''ती कशी काय?''
''माझी नजर तिच्यावर गेली.''
''आणि...''
''मी तिच्या प्रेमात पडलो.''
''पुढे काय झालं?''
''कुठल्याशा धुंदीत मी तिच्याशी लग्न केलं.''
''मग?''
''आणि मला कळून चुकलं...''
''काय?''
''की मी माझं स्वातंत्र्य गमावलंय... मी स्त्रीतंत्र झालोय!''

Thursday, January 8, 2009
प्रेरणा
सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम करणाऱ्या त्या महान फलंदाजाला पत्रकाराने विचारले,
''या विक्रमामागची आपली प्रेरणा कोणती?''
''त्याचं काय आहे, समजा मी शतक केलं तर 'इकडून' एक लाख मिळतात, पण जर मी शून्यावर बाद झालो तर 'तिकडून' पाच लाख मिळतात!''

Tuesday, January 6, 2009
नोकरी आणि चाकरी
मंडईत भाजी घेताना महेशला शाळेतला मित्र भेटला. चहा घेताना दोघांच्या गप्पा रंगल्या.
''तो माझ्या आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू होता.''
''मग?''
''त्यात मी यशस्वी झालो. मला नोकरी लागली आणि मी सरकारी नोकर झालो.''
''अरे वा!''
''नोकरी लागल्यामुळे लगेच माझा दुसरा इंटरव्ह्यू झाला.''
''दुसरा इंटरव्ह्यू?''
''हो, त्यातही मी यशस्वी झालो.''
''काय सांगतोस!''
''त्या उपवर मुलीला मी पसंत पडलो आणि माझं लग्न झालं.
''छान...''
''तेव्हापासून मी ऑफिसात नोकरी करतो आणि घरी गेल्यावर त्या क्षणी खूप आवडलेल्या त्या मुलीची चाकरी करतो....''

Saturday, January 3, 2009
समारोप...
कविसंमेलन रंगात आलं होतं.
''...आता रात्रीचे बारा वाजलेत, तेव्हा आपल्यातील ज्येष्ठ कवी दगडुसुत समारोपाची कविता म्हणून या मैफलीचा समारोप करतील.''
एवढं बोलून सूत्रसंचालक त्यांच्या हातात माईक देणार तोच जवळजवळ खेचूनच धोंडुसुतांनी माईकचा ताबा घेतला.
''कविमित्रांनो, एक मिनीट, समारोपावरून मला आताच सुचलेली एक कविता मी समारोपापूर्वी सादर करतो. त्यानंतर दगडुसुत समारोप करतील...''
आणि त्यानंतर गंगूकुमार, शेवंताग्रज, लालकवी यांच्याकडे माईक फिरत राहिला. पहाटे कोंबडा आरवला तरी दगडुसुतांच्या हाती काही माईक आला नाही... आणि तानाजी बाळाच्या भूपाळीने एका नव्या मैफलीचा प्रारंभ झाला.

Friday, January 2, 2009
कसं कळलं असतं?
ऐन दारूबंदी सप्ताहात दारूबंदी खात्यातील एका कर्मचाऱ्याला तर्रर्र अवस्थेत पोलिसांनी अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे पाच लिटर दारूचा कॅन सापडला. पोलिसांनी जागेवरच पंचनामा करून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावून घेतले. वरिष्ठाने आल्या आल्या त्याला फटकारले, ''मूर्खा दारूबंदी खात्याचा कर्मचारी असून तू हे काय केलंस?''
''साहेब, मी एका दारूच्या अड्ड्यावर धाड घातली आणि ही पाच लिटर दारू जप्त केली...''
''अरे, पण ती ढोसायची काय गरज होती?''
''वा साहेब, त्याशिवाय ती दारूच आहे, हे मला कसं कळलं असतं?''

Thursday, January 1, 2009
स्वयंचलित!
नववर्षाच्या पूर्वसंध्येला सदाने यथेच्छ मद्यपान केले. बारा वाजता नववर्षाच्या स्वागताच्या फटाक्यांनी त्याला घरी जाण्याची जाणीव झाली. कसाबसा तो हॉटेलच्या बाहेर आला आणि गुरख्याला टीप देऊन मोटारसायकल स्टार्ट करून घेतली. पहिल्याच चौकात पोलिसांच्या तपासणी पथकाने त्याला अडविले.
''महाशय, आपण मद्यपान केले आहे.''
''हो, खोटं कशाला बोलू?''
''आणि दारू पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. एक हजार रुपये दंड भरावा लागेल.''
''पण मी कुठे गाडी चालवत होतो.''
''पण या गाडीवर तर तुम्ही एकटेच आलात, मग गाडी कोण चालवत होतं?''
''हवालदार साहेब, माफ करा. गाडीवर मी आलो हे खरं आहे, पण गाडी मी चालवलीच नाही!''
''कसं काय?''
''अहो, हे स्वयंचलित दुचाकी वाहन आहे साहेब, ऑटोमॅटिक... मी फक्त त्यावर बसलो होतो!''

Subscribe to:
Comments (Atom)