पत्नी - मी म्हणून टिकले, दुसरी कुणी असती ना, तर...
पती - तर काय?
पत्नी - तर आतापर्यंत कधीच सोडून गेली असती....
पती - अगं, तोच तर प्रॉब्लेम आहे!
पत्नी - (चिडून) म्हणजे?
पती - तू कुंकू नाहीस, टिकली आहेस!
Sunday, February 1, 2009
Wednesday, January 28, 2009
औषध
खोकल्याने हैराण झालेल्या सदाला डॉक्टरांनी कफ सिरप लिहून दिले.
''सकाळ-दुपार-संध्याकाळ असे तीन वेळा घे.'' डॉक्टरांनी सांगितले.
मध्यरात्री सदाच्या बायकोचा डॉक्टरांना फोन आला.
''डॉक्टर, ताबडतोब या. हे कसेतरीच करतायत...''
डॉक्टर लगबगीने गेले. तपासताना त्यांना शेजारच्या टीपॉयवर भलीमोठी कफ सिरपची बाटली दिसली. त्यांनी सदाला विचारले,
''सदा, औषध किती वेळा घेतलं?''
''सकाळ-दुपार-संध्याकाळ... तीन वेळा एक-एक पेग घेतला डॉक्टर!''

Sunday, January 25, 2009
आमचे हे!
लक्ष्मीबाई - तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कित्ती छान आहे नाही! नाहीतर आमचे हे... मेलं कौतुकच नाही कसलं!
पार्वताबाई - तुमच्या मिस्टरांबद्दल माझंही असंच मत आहे.... नाहीतर आमचे हे!

Saturday, January 24, 2009
व्याख्या
घटस्फोट घेण्यापूर्वी त्या उभयतांना न्यायाधीशांनी केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून समुपदेशकाकडे (काऊन्सिलरकडे) पाठविले.
समुपदेशकाने पत्नीला विचारले, ''तुमची पतीबद्दलची व्याख्या काय?''
पत्नी - मी जे काही चांगले करते त्यावर जो बोळा फिरवतो आणि माझ्या हातून जे काही वाईट घडते त्याला कारणीभूत असलेला एकमेव प्राणी! ज्याच्यामुळे माझ्या सोन्यासारख्या संसाराचे वाटोळे झाले.
समुपदेशक - मिस्टर, तुमच्या मनातली पत्नीची व्याख्या सांगा...
पती - माझ्यामुळे जे काही चांगले होते, त्याचे श्रेय घेण्यात जी नेहमीच तत्पर असते आणि तिच्यामुळे जे काही वाईट घडते त्याचा दोष जी कायम माझ्या कपाळी मारते ती!

Friday, January 23, 2009
प्रायश्चित्त
''काय हो सावित्रीबाई, आजच्या आधुनिक काळातही वटसावित्रीची पूजा तुम्ही अगदी धूमधडाक्यात करता... बरंच प्रेम दिसतंय नवऱ्यावर! जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणूनच ना?''
''नाही हो! वर्षभर केलेल्या प्रार्थनेचं प्रायश्चित्त म्हणून करते.''
''प्रायश्चित्त अन् ते बाई कसलं?''
''वर्षभर रोज मी देवाजवळ प्रार्थना करत असते, की असा नवरा मलाच काय, कुठल्याच बाईला देऊ नकोस रे देवा!''

Wednesday, January 21, 2009
फिक्सिंग
जागतिक मंदीमुळे मार्केटिंग क्षेत्रातील नोकरी गमावलेल्या अमरने पुण्यातल्या मध्यवस्तीत अतिशय छोटेखानी जागेत हॉटेल सुरू केले. तेथे फक्त वडापाव हा एकच पदार्थ ठेवला. पहिल्याच दिवशी त्याच्या ह़ॉटेलपुढे रांग लागली. अल्पावधीत त्याचा वडापाव प्रसिद्ध झाला. चोखंदळ पुणेकर तासन् तास रांगेत उभे राहून वडापावचा आस्वाद घेऊ लागले.
अमरच्या एका मित्राने त्याला विचारले, ''कशी काय बुवा तुझ्याकडे एवढी गर्दी असते. नक्कीच काहीतरी खास रेसिपी असणार!''
''काही नाही रे, माझा वडापाव, रस्त्यावरच्या वडापावसारखाच आहे. फक्त मी गर्दीचं फिक्सिंग केलं.''
''म्हणजे?''
''अरे, मी पहिल्या दिवसापासून कायम दुकानापुढे रांग राहील याची काळजी घेतली. प्रसंगी भाडोत्री ग्राहक उभे करून... आपली नेतेमंडळी नाही का, सभेला गर्दी जमवतात तसंच!''

पिच्छा
कॉलेजच्या कँटीनमध्ये राखी आपल्या मैत्रिणीला सांगत होती-
''अगं जाम वैतागले होते मी, त्या काळ्या संजूनं माझा पक्का पिच्छा पुरविला होता. मी जाईल तिथे माझ्या मागेच!''
''मग कसा काय सोडविला पिच्छा?''
''काही नाही गं, थोडं डोकं चालवलं.''
''ते कसं?''
''एकदा धाडस करून त्याला सामोरी गेले.''
''आणि?''
''त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढविला.''
''कसा काय?''
''त्याला म्हणाले- तुझ्यासारख्या एवढ्या स्मार्ट, देखण्या, रुबाबदार तरुणानं असं माझ्या मागेमागे येणं काही बरं दिसत नाही. त्यापेक्षा, आजपासून मीच तुझ्या मागे लागते... अट फक्त एकच- मागे वळून पाहायचं नाही... खात्री बाळग मी तुझ्याच मागे असेल!''

Subscribe to:
Posts (Atom)