Sunday, March 14, 2010

खुशी आणि गम

लग्न लागल्या दिवशीच पीटर बारमध्ये दिसला, तेव्हा वेटरने आश्चर्याने विचारले,
''अहो साहेब, दुपारीच तुमचे लग्न लागले आणि संध्याकाळी तुम्ही इथे!''
''अरे यार आज मै बहुत खुश हूँ... आज माझी सुहाग रात...''
दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पुन्हा बारमध्ये दिसला, तेव्हा -
''साहेब, काल तुमची सुहाग रात... आणि आज सकाळीच तुम्ही इथे!''
''काय करणार, सुहाग रात्रीलाच आमची तर्रर्र अवस्था पाहून बायको उडाली भुर्रर्र... त्याच गममध्ये आलोय!''

Sunday, March 7, 2010

सेलिब्रेशन..

काय मग, आज तुमच्या लग्नाचा विसावा वाढदिवस...
हो!
मग काही विशेष सेलिब्रेशन?
केलं ना!
काय?
कचकचून भांडलो...
आँ?
एकमेकांची उणीदुणी काढली!
आणि?
दिवसभर अबोला धरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या...!

Thursday, December 31, 2009

अर्धा प्याला भरलेला!

नैराश्याने खूपच ग्रासल्याने मध्या एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला.

''डॉक्टर, मला खूप निराश वाटतंय, जगण्यात काही अर्थच नाही अशी माझी भावना झालेली आहे.''

''हे बघ, एवढा निराश होऊ नकोस. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहा.''

''पण ते कसं पाहायचं?''

''मला एक सांग, की तुला अर्धा भरलेला काचेचा ग्लास कसा दिसतो?''

''डॉक्टर, त्यात जर पाणी असेल, तर तो ग्लास मला अर्धा रिकामा वाटतो आणि जर त्यात दारू असेल तर तो मला भरलेला वाटतो....''

Wednesday, February 4, 2009

ती

राजू - तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही.
संजू - काय सांगतोस!
राजू - आणि ती प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही...
संजू - म्हणजे?
राजू - कारण, ती माझ्या स्वप्नातली परी आहे.
संजू - छान!
राजू - जगातल्या निर्दय तरुणींपेक्षा नक्कीच बरी आहे...

Sunday, February 1, 2009

कुंकू आणि टिकली

पत्नी - मी म्हणून टिकले, दुसरी कुणी असती ना, तर...
पती - तर काय?
पत्नी - तर आतापर्यंत कधीच सोडून गेली असती....
पती - अगं, तोच तर प्रॉब्लेम आहे!
पत्नी - (चिडून) म्हणजे?
पती - तू कुंकू नाहीस, टिकली आहेस!

Wednesday, January 28, 2009

औषध

खोकल्याने हैराण झालेल्या सदाला डॉक्टरांनी कफ सिरप लिहून दिले.
''सकाळ-दुपार-संध्याकाळ असे तीन वेळा घे.'' डॉक्टरांनी सांगितले.
मध्यरात्री सदाच्या बायकोचा डॉक्टरांना फोन आला.
''डॉक्टर, ताबडतोब या. हे कसेतरीच करतायत...''
डॉक्टर लगबगीने गेले. तपासताना त्यांना शेजारच्या टीपॉयवर भलीमोठी कफ सिरपची बाटली दिसली. त्यांनी सदाला विचारले,
''सदा, औषध किती वेळा घेतलं?''
''सकाळ-दुपार-संध्याकाळ... तीन वेळा एक-एक पेग घेतला डॉक्टर!''

Sunday, January 25, 2009

आमचे हे!

लक्ष्मीबाई - तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कित्ती छान आहे नाही! नाहीतर आमचे हे... मेलं कौतुकच नाही कसलं!
पार्वताबाई - तुमच्या मिस्टरांबद्दल माझंही असंच मत आहे.... नाहीतर आमचे हे!